My New Poem
मन हे नेहमीचकधी हे भर दिवसाहीआकाशात चांदण्या शोधतेतर कधी काळोख्या रात्रीहे सावली शोधत असतेकधी हे खुप पुढचाविचार करुन येतेतर कधी साध्या, सरळगोष्टीतही अडकुन पडतेकधी हे डोक्यातलीगणीते सोडवतेतर कधी ह्रुदयातल्यातालीवर नाचतेकधी मित्रांच्या गर्दितहीहे एकटेपण शोधतेतर कधी भुतकाळातल्याआठवणींच्या गर्दित हरवुन जातेकळले ना कधी कुणालाह्याच ठाव ठिकाणाकारण मन हे नेहमीचकुणालातरी शोधत असते.......
